esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 07 जून 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscoep and Astrology

सोमवार : वैशाख कृष्ण १२, सोमप्रदोष, भारतीय सौर ज्येष्ठ १७ शके १९४३.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 07 जून 2021

sakal_logo
By
प्रा. रमणलाल शहा

पंचांग

सोमवार : वैशाख कृष्ण १२, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय पहाटे ४.१९, चंद्रास्त दुपारी ४.४०, सोमप्रदोष, भारतीय सौर ज्येष्ठ १७ शके १९४३.

दिनविशेष

१९६९ : पूर्वीच्या पुणे नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी शंकर रामचंद्र ऊर्फ

अप्पासाहेब भागवत यांचे निधन. त्यांनी पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून १९१८ पर्यंत काम केले. पुढे त्यांनी पुणे नगरपालिकेचे कर्तबगार, करारी शिस्तप्रिय मुख्याधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला. पावसाचे पाणी वाया जाऊ न देता जमिनीत कसे मुरवावे याचे संशोधन करून ते प्रयोग करीत.

१९७९ : भारताने भास्कर' हा दुसरा उपग्रह अंतराळात सोडला.

२००० लहान मुलांच्या मेळाव्यात अधिक रमणारे 'मुलांचे नाना' ज्येष्ठ बालसाहित्यकार गोपीनाथ तळवलकर यांचे निधन.

२००३ महाराष्ट्राचे माजी राष्ट्रीय कबड्डीपटू बाळासाहेब ऊर्फ विश्वनाथ गणपतराव कोंढाळकर यांचे निधन.

हेही वाचा: साप्ताहिक राशिभविष्य (६ जून २०२१ ते १२ जून २०२१)

राशिभविष्य

मेष: आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ: मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढल. जिद व चिकाटी वाढेल.

मिथुन: मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क: सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दवदवा वाढेल. मान व प्रतिष्ठा वाढेल.

सिंह मानसिक अस्वस्थता कमी होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या आर्थिक सुयश लाभेल. नातेवाइकांच सहकार्य लाभेल.

तूळ भागीदारीतील निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

वृश्चिक काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची वार्ता समजेल.

धनू मुलामुलींसाठी खर्च होईल. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

मकर तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कुंभ: आरोग्य उत्तम राहील. हितशत्रूंवर मात कराल. जिद व चिकाटी वाढेल.

मीन: आर्थिक सुयश लाभेल. जुनी यणी वसूल होतील.