esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 एप्रिल 2021
sakal

बोलून बातमी शोधा

sakal rashibhavishya

२१ एप्रिल २०२१ , बुधवार : चैत्र शुद्ध ९, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी १.१६, चंद्रास्त रात्री २.४०

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 एप्रिल 2021

sakal_logo
By
प्रा. रमणलाल शहा

२१ एप्रिल २०२१ , बुधवार : चैत्र शुद्ध ९, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी १.१६, चंद्रास्त रात्री २.४०, श्रीराम नवमी, देवी नवरात्र समाप्ती, देवीला दवणा वाहणे, भारतीय सौर वैशाख १ शके १९४३.

दिनविशेष

१८९६ : प्रसिद्ध राजकीय नेते केशवराव जेधे यांचा जन्म. शेतकरी कामगार पक्षाचे ते एक संस्थापक असून, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ते प्रमुख नेते होते.

१९९७ : हायड्रोकार्बन साखळीतील 'मिथेन' या सर्वांत लहान असलेल्या घटकाचे उच्चस्तरीय हायड्रोकार्बनमध्ये रूपांतर करण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) संशोधकांना यश.

१९९८ : अमेरिकेतील केअर' या आंतरराष्ट्रीय विकास व साह्य संस्थेचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुरस्कार.

हेही वाचा: साप्ताहिक राशिभविष्य ( ता. १८ एप्रिल २०२१ ते २४ एप्रिल २०२१)

राशिभविष्य

मेष - आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल.

वृषभ - नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

मिथुन - उधारी, उसनवारी वसूल होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क - कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

सिंह - कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. महत्वाची कामे पुढे ढकलावीत.

कन्या: नवीन गाठीभेटी व परिचय होतील. अपेक्षित पत्र व्यवहार होईल.

तूळ - नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नोकरीत चांगली स्थिती राहील.

वृश्चिक - अपेक्षित गाठीभेटी होतील. काहींना गुरूकृपा लाभेल.

धनू - खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर - शासकीय कामात यश लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

कुंभ - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मीन - संततिसौख्य लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

loading image