
22 एप्रिल 2021, गुरुवार चैत्र शुद्ध १०, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.९४, सूर्यास्त ६.५२
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 एप्रिल 2021
पंचांग - 22 एप्रिल 2021, गुरुवार चैत्र शुद्ध १०, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.९४, सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय दुपारी २.१४, चंद्रास्त पहाटे ३.२४, भारतीय सौर वैशाख २ शके १९४३.
दिनविशेष
१९२९ : विख्यात भाषाशास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक डॉ. अशोक केळकर यांचा जन्म. 'भाषा आणि भाषाव्यवहार', 'प्राचीन भारतीय साहित्य मीमांसा', 'मराठी भाषेचा आर्थिक संसार' वगैरे त्यांची पुस्तके अभ्यासकांना प्रिय आहेत.
१९७९ : आचार्य विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले.
१९९५ : आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत एस. विजयालक्ष्मीने आशियाई विजेती भाग्यश्री ठिपसेवर विजय नोंदवून 'इंटरनॅशनल वूमेन मास्टर' होण्याचा मान मिळविला. 'इंटरनॅशनल वूमन मास्टर' होणारी विजयालक्ष्मी ही सातवी भारतीय खेळाडू आहे.
१९९७ : राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे संचालक (एनआयव्ही) डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अतिशय महत्त्वपूर्ण मानला जाणारा कै. ओमप्रकाश भसीन पुरस्कार' जाहीर.
हेही वाचा: साप्ताहिक राशिभविष्य ( ता. १८ एप्रिल २०२१ ते २४ एप्रिल २०२१)
राशिभविष्य
मेष: संततिसौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ: सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मिथुन: नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.
कर्क: व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. आर्थिक कामे यशस्वी होतील.
सिंह: तुमचा इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गों लावू शकाल.
कन्या खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
तूळ प्रियजनांचा सहवास लाभेल. सततीचे प्रश्न मार्गी लागतील.
वृश्चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. तुम्ही आपल्या मतांबद्दल आग्रही राहाल.
धनू : प्रवास सुखकर होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मकर सहकार्याची अपेक्षा नको. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.
कुंभ: वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मतभेद कमी करू शकाल.
Web Title: Daily Horoscope 22 April 2021
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..