आजचे राशिभविष्य - २७ जानेवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

१९०१ - थोर विचारवंत, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा पश्‍चिम खानदेशमध्ये पिंपळनेर येथे जन्म.

१९२६ - लष्कराचे माजी सरसेनापती जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य यांचा जन्म. १९६५ व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामधील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘महावीर चक्र’ प्रदान करण्यात आले.
१९४६ - थोर अर्थशास्त्रज्ञ आणि महाराष्ट्र बॅंकेचे संस्थापक आणि दीर्घ काळ अध्यक्ष असलेले प्रा. वामन गोविंद काळे यांचे निधन. त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक समित्यांवरही काम केले होते.
१९०१ - थोर विचारवंत, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा पश्‍चिम खानदेशमध्ये पिंपळनेर येथे जन्म.
१९७६ - नामवंत संगीत दिग्दर्शक शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचे निधन. 
२००१ - भारताचा नेमबाज अभिनव बिंद्राने सलग चार सुवर्णपदके पटकाविण्याचा विक्रम केला.  

दिनमान
मेष : व्यवसायाच्या जागेची कामे मार्गी लावू शकाल. भावंडांबरोबर सुसंवाद साधू शकाल. 
वृषभ :  जिद्द वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक वातावरण सौख्यकारक राहील. 
मिथुन : प्रॉपर्टीच्या संदर्भातील कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मित्रमैत्रिणींचे सहकार्य मिळेल.
कर्क : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा खर्च खर्च करताना काळजी घ्यावी. 
सिंह : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत.  
कन्या : काहींना बढती मिळण्याची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहील. 
तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आत्मविश्‍वास वाढणार आहे. 
वृश्‍चिक  : मित्रमैत्रिणींच्या आश्‍वासनांवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. 
धनू : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.  शैक्षणिक कामे दुपारनंतर करावीत. 
मकर : मनोरंजनावर अधिक खर्च होण्याची शक्‍यता आहे. नोकरीत चांगली स्थिती राहील. 
कुंभ : कोणालाही उसनवारी पैसे देऊ नये. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. 
मीन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आर्थिक कामे मार्गी लागतील.
प्रा. रमणलाल शहा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daily-horoscope-27th-january-2021