
पंचांग -
मंगळवार - कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६.४५, चंद्रास्त सकाळी ७.२६, भारतीय सौर मार्गशीर्ष १० शके १९४२.
पंचांग -
मंगळवार - कार्तिक कृष्ण १, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.५१ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ६.४५, चंद्रास्त सकाळी ७.२६, भारतीय सौर मार्गशीर्ष १० शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
जागतिक एड्स प्रतिबंध दिन (युनेस्को)
१८८५ - ज्येष्ठ गांधीवादी, गुजराती साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा काकासाहेब कालेलकर यांचा जन्म.
१९०९ - आधुनिक मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी, लेखक व समीक्षक बाळ सीताराम मर्ढेकर यांचा जन्म. त्यांचे ‘शिशिरागमन’, ‘काही कविता’, ‘आणखी काही कविता’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘रात्रीचा दिवस’, ‘तांबडी माती’, ‘पाणी’ या कादंबऱ्या असून त्यांनी ‘नटश्रेष्ठ’ हे नाटकही लिहिले आहे.
१९७७ - एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून दीर्घकाळ काम पाहणाऱ्या प्रेमलीलाबाई ठाकरसी यांचे निधन.
१९९९ - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ‘वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.
२००० - सरत्या शतकातील अखेरच्या स्पर्धेत ‘जगत सुंदरी’ होण्याचा बहुमान भारताच्या प्रियांका चोप्राने पटकाविला.
२००२ - प्रसिद्ध व्यंगचित्रकार व पत्रकार अबू इब्राहिम यांचे निधन. भारत व ब्रिटनमधील वृत्तपत्रांसाठी अब्राहम यांनी जवळजवळ पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत हजारो व्यंगचित्रे काढली होती.
दिनमान -
मेष : आपली मते इतरांना पटवून द्याल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. मन आशावादी राहील.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. नवीन स्नेहसंबंध जुळतील.
कर्क : मित्रांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.
सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामात यश लाभेल.
कन्या : काहींना गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी.
वृश्चिक : प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनु : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
मीन : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.
Edited By - Prashant Patil