esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 1 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार - निज आश्विन कृष्ण १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सायंकाळी ६.४०, चंद्रास्त सकाळी ७.१०, भारतीय सौर कार्तिक १० शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 1 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - निज आश्विन कृष्ण १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सायंकाळी ६.४०, चंद्रास्त सकाळी ७.१०, भारतीय सौर कार्तिक १० शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१८ - रंगभूमी आणि चित्रपटांत सहा दशकांहून अधिक काळ विनोदी व गंभीर अभिनयाच्या शेकडो छटांचे सहजसुंदर दर्शन घडविणारे अभिनेते शरद तळवलकर यांचा जन्म.
१९५० - आगगाडीची इंजिने बनविणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्‍स या कारखान्याचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्‌घाटन.
१९५६ - राज्य पुनर्रचना कायद्यानुसार द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले.  यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
१९६६ - पंजाबचे विभाजन होऊन पंजाबीभाषक ‘पंजाब’ आणि हिंदीभाषक ‘हरियाना’ अशी दोन राज्ये निर्माण करण्यात आली.
१९८६ - नामवंत लेखिका आनंदीबाई शिर्के यांचे निधन.
१९९२ - प्रसिद्ध गायिका गानतपस्विनी इंदिराबाई खाडिलकर यांचे मिरज येथे निधन.
१९९३ - ठुमरी, दादरा व गझल या क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका नैनादेवी यांचे निधन.
१९९४ - मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून ‘चित्रभूषण पुरस्कारा’साठी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते, लेखक दिनकर द. पाटील यांची निवड.
१९९४ - शेती आणि पाणी विषयाचे तज्ज्ञ, लाल निशाण पक्षाचे नेते आणि कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.
१९९५ - मराठीतील ज्येष्ठ कथाचित्रकार प्रभाशंकर कवडी यांचे निधन.
१९९६ - भारताच्या पी. हरिकृष्णनने दहा वर्षांखालील मुलांच्या गटाची जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. जागतिक स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे.
१९९९ -  कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर पुरस्कार’ हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

दिनमान -
मेष :
वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायात उत्तम स्थितीआरोग्य उत्तम राहील. 
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्‍यता आहे.
मिथुन : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.
कर्क : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी लाभतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
कन्या : प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.आत्मविश्‍वास उत्तम राहील.
तुळ : भागीदारी व्यवसायात सुसंधी लाभेल. प्रवास सुखकर होतील.जिद्द वाढेल.
वृश्‍चिक : हाताखालील व्यक्‍तींचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
मकर : कौटुंबिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.जिद्द वाढेल.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. 

Edited By - Prashant Patil