esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 ऑक्टोबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 ऑक्टोबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 ऑक्टोबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : भाद्रपद कृष्ण ११, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय पहाटे ३.१४, चंद्रास्त दुपारी ३.४४, इंदिरा एकादशी, एकादशी श्राद्ध, भारतीय सौर आश्विन १० शके १९४३.

दिनविशेष -

अहिंसा दिन

१८६९ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म. त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी. दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील गोरेतर जमातीवर, विशेषतः हिंदी लोकांवर व तेथील मजुरांवर होणाऱ्या जुलमाविरुद्ध सत्याग्रहाचा किंवा निःशस्त्र प्रतिकाराचा प्रयोग गांधीजींनी केला. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंगाची घोषणा केली. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत ‘छोडो भारत’ आंदोलनाची घोषणा केली.

१८९१ : विख्यात शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. त्यांना ‘पद्मश्री’ हा सन्मान प्रदान करण्यात आला होता.

१९०४ : भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म. १९२५ मध्ये त्यांनी काशी विद्यापीठाची ‘शास्त्री’ ही पदवी मिळविली. त्यांचे आडनाव श्रीवास्तव असे होते. ‘जय जवान जय किसान’ ही त्यांची घोषणा त्या वेळी स्फूर्ती देणारी ठरली. त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला.

दिनमान -

मेष : प्रसन्नता लाभेल. व्यवसायात वाढ

होईल.

वृषभ : मनोबल वाढेल. आत्मविश्‍वास वाढेल.

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्य चांगले राहणार आहे.

कन्या : आरोग्य उत्तम

राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.

तूळ : उत्साह व उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. सुसंधी लाभेल.

धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास टाळावेत.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

कुंभ : हितशत्रूंवर मात कराल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

loading image
go to top