
पंचांग -
गुरुवार - कार्तिक कृष्ण ३, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५३ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय रात्री ८.२८, चंद्रास्त सकाळी ९.१५, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर मार्गशीर्ष १२ शके १९४२.
पंचांग -
गुरुवार - कार्तिक कृष्ण ३, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५३ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय रात्री ८.२८, चंद्रास्त सकाळी ९.१५, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर मार्गशीर्ष १२ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
जागतिक अपंग दिन ( युनेस्को)
१८८४ - भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा जन्म. स्वतंत्र भारताच्या घटनासमितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या पदाचा पगार कमी करून घेतला होता व राष्ट्रपतिभवनातील राहणीत अतिशय साधेपणा आणला होता.
१९५१ - प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. त्यांच्या कविता वऱ्हाडी, खानदेशी बोलीत आहेत.
२००४ - आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके; तसेच सुब्रह्मण्यम भारती, शरच्चंद्र बोस, त्रिदीपकुमार चौधरी यांच्या तैलचित्रांचे अनावरण उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये समारंभपूर्वक झाले.
दिनमान -
मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना गुरूकृपा लाभेल.
वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.
मिथुन : प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
कर्क : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
सिंह : काहींचे नवीन परिचय होतील. संततिसौख्य लाभेल.आर्थिक लाभाचे प्रमाणवाढेल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. नोकरी,व्यवसायात उत्तम स्थिती. इतरांवर प्रभाव राहील.
तुळ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तमराहील.
वृश्चिक : वादविवाद टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहील.
धनु : महत्त्वाची कामे पार पडतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
मीन : आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभाचे प्रमाणवाढेल.
Edited By - Prashant Patil