esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 05 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शनिवार - कार्तिक कृष्ण ५, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.५४ सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय रात्री १०.२१, चंद्रास्त सकाळी १०.५७, भारतीय सौर मार्गशीर्ष १४ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 05 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शनिवार - कार्तिक कृष्ण ५, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.५४ सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय रात्री १०.२१, चंद्रास्त सकाळी १०.५७, भारतीय सौर मार्गशीर्ष १४ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी स्वयंसेवक दिन (युनेस्को)
१९५० : पूर्वायुष्यात क्रांतिकारक आणि नंतर योगी म्हणून गाजलेले अरविंद घोष यांचे निधन.
१९५९ : विख्यात क्रिकेटपटू दुलिपसिंह यांचे निधन.
१९९१ : ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे निधन.
१९९७ : ज्योतिष्पीठाचे ज्येष्ठ शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी बाग आश्रमात निधन झाले.
१९९८ - चाफळकर चित्रपट उद्योगसमूहाचे एक संस्थापक पांडुरंग विनायक ऊर्फ बापूसाहेब चाफळकर यांचे निधन.
१९९९ : चालू सहस्रकाच्या शेवटच्या विश्‍वसुंदरी स्पर्धेत भारताच्या युक्ता मुखी विश्‍वसुंदरी म्हणून निवड.
१९९९ : ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार, स्वातंत्र्यसैनिक व शेती सिंचन विषयाचे व्यासंगी मार्गदर्शक वसंत गणेश ऊर्फ बापूसाहेब उपाध्ये यांचे निधन.
१९९९ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख नेते, महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत बाळकृष्ण रंगराव सुंठणकर यांचे निधन.
२००३ :  ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘डेटा क्वेस्ट जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
मानसिक प्रसन्नता लाभेल. कर्तृत्त्वाला संधी मिळेल. नवीन हितसंबंध जुळतील.
वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्‍यता.
कन्या : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. कलेच्या क्षेत्रात सहभागी होण्याची संधी.
तुळ : लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. अपेक्षित गाठीभेटी होतील.
धनु : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची बातमी समजेल.
मकर : शासकीय कामात यश मिळेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासाचे योग येतील.
मीन : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil

loading image