esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 06 जून 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscoep and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 06 जून 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : वैशाख कृष्ण ११, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय पहाटे ३.४३, चंद्रास्त दुपारी ३.५१, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, अपरा एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ १६ शके १९४३.

दिनविशेष -

१९९४ - वेस्ट इंडीजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

१९९४ - लष्कराने घेतलेली जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करणाऱ्या ‘पृथ्वी’ या आखूड पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची प्रत्यक्ष वापरासाठी झालेली दुसरी चाचणी यशस्वी.

१९९४ - ‘शिक्षण प्रसारक मंडळी’चे आजीव सदस्य आणि नू.म.वि. प्रशालेचे माजी मुख्याध्यापक प्रा. ग. य. दीक्षित यांचे निधन.

१९९९ - मुंबईपासून १६० किलोमीटर अंतरावर ‘मुंबई हाय’मध्ये तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या वायू विहिरीला लागलेली आग तब्बल ८६ दिवसांनी आटोक्‍यात आणण्यात यश.

१९९९ - विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेतील अष्टपैलू खेळाडू लान्स क्‍लूसनरने सलगच्या सामन्यात एकदाही बाद न होता ३९६ धावा ठोकण्याचा नवा विक्रम केला.

दिनमान -

मेष : कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आरोग्य संभाळा.

मिथुन : आर्थिक सुयश लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे.

तूळ : महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

वृश्‍चिक : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

धनू : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक सुयश लाभेल.

मकर : गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कुंभ : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. शत्रुपीडा जाणवेल.

मीन : आरोग्य उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.