esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 06 मे 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Astrology and Horoscope

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 06 मे 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : चैत्र कृष्ण १०, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय : ६.०५, सूर्यास्त : ६.५६ चंद्रोदय पहाटे ३.२६, चंद्रास्त दुपारी २.४०, भारतीय सौर वैशाख १६ शके १९४३.

दिनविशेष -

१९२२ : कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे निधन. ते सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते होते. जातिव्यवस्थेविरुद्ध त्यांनी प्रत्यक्ष कृतीने पुढाकार घेतला. कला, नाटक, संगीत यांना त्यांनी प्रोत्साहन दिले.

१९६६ : रॅंग्लर र. पु. परांजपे यांचे निधन. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री. भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या.

१९९९ : महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांना ३० टक्के आरक्षणाचा निर्णय. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

२००० : जुन्या पिढीतील प्रसिद्ध अभिनेत्री निगार सुलताना यांचे निधन.

दिनमान -

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. प्रकृतीची अपेक्षित साथ लाभेल.

वृषभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. राजकीय प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल.

कर्क : कौटुंबिक जीवनात चिंता लागून राहील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

सिंह : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शत्रुपीडा नाही.

तूळ : संततिसौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

धनू : व्यवसायात चांगली स्थिती राहील. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

मकर : आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.