esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 06 ऑक्टोबर 2021 I Horoscope
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 06 ऑक्टोबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : भाद्रपद कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय सकाळी ७.०१, चंद्रास्त सायंकाळी ६.२९, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१७, सर्वपित्री दर्श अमावास्या, अमावास्या श्राद्ध, भादवी पोळा, अमावास्या समाप्ती दु. ४.३५, भारतीय सौर आश्विन १४ शके १९४३.

दिनविशेष -

१७३२ - पहिले नाविक पंचांग करणारे व सागरातील स्थानाचे रेखांश निश्‍चित करण्याची पद्धत शोधून काढणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ नेव्हिल मॅस्केलिन यांचा जन्म.

१७७९ - ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचे गव्हर्नर, प्रशासक व इतिहासकार माउंट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म. त्यांनी ‘हिस्टरी ऑफ इंडिया’ या दोन खंडांत भारताचा इतिहास लिहिला.

१८९३ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांचा जन्म. खगोलभौतिकी या विषयात आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत.

१९१३ - कविवर्य वा. रा. कांत यांचा जन्म. त्यांच्या ‘मावळते शब्द’ या कवितेला कवी केशवसुत पारितोषिक मिळाले.

१९४९ - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) इमारतीची कोनशिला बसविली.

१९९५ - जगप्रसिद्ध वैद्यराज बृहस्पती देवत्रिगुण यांना प्रतिष्ठेचा ‘धन्वंतरी पुरस्कार’ जाहीर.

दिनमान -

मेष : मानसिक अस्वस्थता राहील. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. हाती घेतलेल्या कामात यश.

सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल. उधारी, उसनवार वसूल होईल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

तुळ : मानसिक अस्वस्थता राहील. अनपेक्षितपणे एखादा खर्च संभवतो.

वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम राहील.

धनु : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. गुरुकृपा लाभेल.

कुंभ : अचानक धनलाभाची शक्यता. वाहने जपून चालवा.

मीन : आरोग्य उत्तम राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

loading image
go to top