esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 08 जून 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 08 जून 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : वैशाख कृष्ण १३, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय पहाटे ४.५८, चंद्रास्त सायंकाळी ५.३०, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, शिवरात्री, सूर्याचा मृग नक्षत्रप्रवेश, वाहन – गाढव, भारतीय सौर ज्येष्ठ १८ शके १९४३.

दिनविशेष -

१९१७ : ज्येष्ठ भावगीतगायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांचा जन्म. त्यांची ‘गगनी उगवला सायंतारा...’, ‘मी निरांजनातील वात...’, ‘गर्जा जयजयकार...’, ‘पंचमीचा सण आला...’, ‘चंद्रावरती दोन गुलाब...’, अशी अनेक गाणी लोकप्रिय आहेत.

१९६९ : लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेश मुक्त केला. त्यांना फील्ड मार्शल हे सर्वोच्च लष्करी पद देण्यात आले.

१९९५ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. जी. रंगा यांचे निधन.

दिनमान -

मेष : दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : आर्थिक सुयश लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीच्या कामात विचारविनिमिय करू शकाल.

सिंह : गुरूकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल.

कन्या : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.

धनु : अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

कुंभ : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.