esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 08 मे 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Astrology and Horoscope

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 08 मे 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : चैत्र कृष्ण १२, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय पहाटे ४.३४, चंद्रास्त दुपारी ४.१८, सूर्योदय : ६.०४, सूर्यास्त : ६.५७, भारतीय सौर वैशाख १८ शके १९४३.

दिनविशेष -

१८९९ : रॅंड वधाच्या प्रकरणी फितुरी करणाऱ्या द्रविड बंधूंना ठार करून धडा देणारे वासुदेव हरी चापेकर यांना येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.

१९८१ : नामवंत संस्कृतज्ञ डॉ. के. ना. वाटवे यांचे निधन.

१९८२ : नामवंत मराठी कवी, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल यांचे निधन.

२००३ : ‘भारतीय व्यवहार कोश’ व ‘भारतीय कहावत संग्रह’चे संपादक, कोशकार विश्‍वनाथ दिनकर नरवणे यांचे निधन. पंधरा भारतीय आणि इंग्रजी अशा सोळा भाषांतील समानार्थी शब्दांचा त्यांनी बनविलेला ‘भारतीय व्यवहार कोश’ ही राष्ट्रीय साहित्यातील एक अत्युच्च कलाकृती आहे.

२००३ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ज्ञ डॉ. अमृत माधव घाटगे यांचे निधन. त्यांना आदर्श संस्कृत पंडित म्हणून राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.

दिनमान -

मेष : दैनंदिन कामात अडचणी

जाणवण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभाग राहील.

वृषभ : अपेक्षित गाठीभेटी होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. वादविवाद टाळावेत.

तुळ : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक : प्रियजनांचा सहवास लाभेल. अपेक्षित गाठीभेटी ,व्यवहार होतील.

धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल उत्तम राहील.

कुंभ : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. गुप्त वार्ता समजेल.

मीन : तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल.