esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 09 जून 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 09 जून 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : वैशाख कृष्ण १४, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय पहाटे ५.४०, चंद्रास्त सायंकाळी ६.२१, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ दुपारी १.५९, भारतीय सौर ज्येष्ठ १९ शके १९४३.

दिनविशेष -

१७८१ : जगातील पहिले रेल्वे इंजिन तयार करणारे संशोधक जॉर्ज स्टिफन्सन यांचा जन्म.

१८९० : भारतात रविवारच्या साप्ताहिक सुटीला सुरवात. मुंबईतील गिरणी कामगारांचे नेतृत्व करणारे थोर समाजसेवक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी इंडियन फॅक्‍टरी कमिशनला सादर केलेल्या मागणीपत्रात कामगारांना आठवड्यातून सुटी मिळावी, अशी मागणी केली होती.

१९१९ : प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंके यांचा जन्म.

१९६४ : लालबहादूर शास्त्री यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी.

दिनमान -

मेष : आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कामात अडचणी जाणवण्याची शक्यता.

कर्क : नवीन परिचय होतील. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. एखादी चांगली घटना घडेल.

सिंह : व्यवसायात प्रगती होईल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यवसायात अडचणी जाणवतील.

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मकर : व्यवसायात वाढ करू शकाल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.

कुंभ : प्रॉपर्टीच्या संदर्भात काही प्रस्ताव समोर येतील. नोकरीतील प्रश्‍न सुटतील.

मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल.