esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय सकाळी ६.४०, चंद्रास्त सायंकाळी ७.४४, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, अमावास्या समाप्ती सकाळी ६.४७, इष्टि, भारतीय सौर आषाढ १९ शके १९४३.

दिनविशेष -

१९२३ - प्रसिद्ध मराठी कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. ‘निळासावळा’ व ‘रक्तचंदन’ या त्यांच्या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली.

१९४९ - विक्रमवीर, ‘लिटल मास्टर’ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा जन्म. त्याचे चाहते त्याला ‘सनी’ या नावाने ओळखतात.

१९६९  - गोव्याचे विख्यात इतिहाससंशोधक व पोर्तुगीज कागदपत्रांचे अभ्यासक डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन. १५२६ मध्ये कृष्णदास श्‍यामा यांनी लिहिलेल्या ग्रंथाची प्रत त्यांनी लिस्बनहून आणली आणि गोव्याची लिखित भाषा पूर्णपणे मराठी होती हे प्रस्थापित केले.

१९९२ - संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘इन्सॅट २-ए’ या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून उड्डाण.

१९९२ - पुणे येथून ८५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आर्वी येथील ‘विक्रम इनमरसॅट भू-केंद्र’ केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री राजेश पायलट यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

१९९५ - ‘गरिबांचे डॉक्‍टर’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. रामकृष्ण ऊर्फ दादासाहेब विष्णू केळकर यांचे निधन. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अभिनव भारत मंदिरा’चे ते माजी अध्यक्ष होते.

१९९५ - म्यानमारमधील लोकशाहीवादी चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्‍यी यांची तब्बल सहा वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता.

१९९९ - संतोष शिवन यांच्या ‘द टेररिस्ट’ या चित्रपटास मनिलाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘ग्रॅंड ज्युरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२००० - मराठी चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील अभिनेत्री नीलम यांचे निधन. त्यांना ‘शांता हुबळीकर पुरस्कारा’ने गौरविण्यात आले होते.

२००० - विज्ञानाच्या प्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा मनुभाई मेहता पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.

दिनमान -

मेष : तुमच्या कर्तृत्त्वाला

संधी लाभेल. उत्साह, उमेद वाढेल.

वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : आर्थिक कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : प्रवास शक्यतो टाळावेत. गुप्त वार्ता समजेल.

धनु : भागीदारी व्यवसायात निर्णय मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश.

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : नवीन हितसंबंध निर्माण होतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन : वरिष्ठांचे सहकार्य. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

loading image