esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 जून 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 जून 2021

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पंचांग -

गुरुवार : वैशाख कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय स. ६.३३, चंद्रास्त सायं. ७.१३, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, भावुका अमावास्या, शनैश्चर जयंती, धनिष्ठा नवक समाप्ती सकाळी ११.४४, अमावास्या समाप्ती दुपारी ४.२३, कंकणाकृती सूर्यग्रहण, भारतीय सौर ज्येष्ठ २० शके १९४३.

दिनविशेष -

जागतिक दृष्टिदान दिन । अल्कोहोलिक ॲनानिमस स्थापना दिन

१९०९ : भारताचे लष्करप्रमुख म्हणून गाजलेले जनरल जयंतिनाथ चौधरी यांचा जन्म. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ किताब देऊन सन्मानित केले.

१९१९ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ते लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष डॉ. श्री. श्री. घारे यांचा जन्म.

१९३८ : प्रसिद्ध उद्योगपती व बजाज उद्योगसमूहाचे प्रमुख राहुलकुमार बजाज यांचा जन्म. त्यांना ‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले.

२००१ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या फुलवंताबाई झोडगे यांचे निधन. संपूर्ण भारतामध्ये सावित्रीबाई फुले यांच्यावर पहिले पुस्तक झोडगेअक्कांनी लिहिले होते.

२००२ : प्रसिद्ध शाहीर निवृत्ती बाबूराव पवार यांचे निधन.

दिनमान -

मेष : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने सावकाश चालवावीत.

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. आर्थिक सुयश लाभेल.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणाल.

कन्या : आर्थिक लाभ होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात विसंवाद संभवतो. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : आर्थिक सुयश लाभेल. नवीन परिचय होतील.

कुंभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.

मीन : मनोबल वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.