आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १० मार्च २०२१

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
बुधवार : माघ कृष्ण १२, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय पहाटे ५.२८, चंद्रास्त दुपारी ४.०६, सूर्योदय ६.४७, सूर्यास्त ६.४१, प्रदोष, श्रवणोपास, भारतीय सौर फाल्गुन १९ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९७ - अक्षरे गिरविण्यास शिकवून महाराष्ट्रातील मुलींना शब्दांचे अंगण खुले करुन देणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे निधन.
१९२९ - ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म. धारानृत्य, जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे, छोरी, शर्मिष्ठा, उत्सव, वात्रटिका, भोलनाथ, मीरा, विदूषक, बबलगम, सलाम, तुझे गीत गाण्यासाठी, गझल, उदासबोध, बोलगाणी, त्रिवेणी अशा काव्यसंपदेने पाडगावकरांनी ‘शब्दसृष्टीचा ईश्‍वर’ अशी प्रतिमा काव्यप्रेमींच्या मनात निर्माण केली. 
१९५२ - केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीचा पाया या कारखान्यामुळे घातला गेला.
१९९८ - भारतीय ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंदला लिनारेस सुपर ग्रॅंडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद.
१९९९ - तपस्वी प्रतिभावंत व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आजचा दिवस अनेक दृष्टीने अनुकूल आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.
मिथुन : उधारी, उसनवारी वसूल होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कर्क : अपेक्षित सुसंधी लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
सिंह : काहींचा आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील. वाहने सावकाश चालवावीत.
कन्या : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक सुयश लाभेल.
तुळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील. 
वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
धनु : व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मकर : आपल्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. मान व प्रतिष्ठा लाभेल.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com