esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 सप्टेंबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : भाद्रपद शुद्ध ४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, चंद्रोदय सकाळी ९.१८, चंद्रास्त रात्री ९.१७, श्री गणेश चतुर्थी, पार्थिव गणेश पूजन, चंद्रदर्शन निषेध, जैन संवत्सरी (चतुर्थी पक्ष) भारतीय सौर भाद्रपद १९ शके १९४३.

दिनविशेष -

१८७२ : विख्यात क्रिकेटपटू रणजितसिंह यांचा जन्म. त्यांच्या स्मरणार्थ रणजी करंडक क्रिकेट सामने खेळले जातात.

१९६६ : पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाना, अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.

१९९६ : पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स या संस्थेतील मद्दाली विवेकानंद यांची अहमदाबाद येथील नडियाद हरि ओम आश्रमातर्फे दिल्या जाणाऱ्या विक्रम साराभाई संशोधन पुरस्कारासाठी निवड.

दिनमान -

मेष : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. संततिसौख्य लाभेल.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनू : नवीन परिचय होतील. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.

मीन : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

loading image
go to top