esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 ऑक्टोबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 ऑक्टोबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

सोमवार : आश्विन शुद्ध ६, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय सकाळी ११.२०, चंद्रास्त रात्री १०.३४, सरस्वती आवाहन (१२.५६ नं.), भारतीय सौर आश्विन १९ शके १९४३.

दिनविशेष -

२००० : अंतराळात गेलेली पहिली महिला हा बहुमान मिळविणाऱ्या रशियाच्या व्हॅलेंटिना तेरेश्‍कोवा यांना ‘शतकातील महिला’ पुरस्कार जाहीर. लंडनमधील ‘इंटरनॅशनल वूमन ऑफ द इयर’ या संघटनेने या पुरस्काराची घोषणा केली.

२००१ : त्रिनिदादमध्ये जन्मलेले ब्रिटिश लेखक सर विद्याधर सूरजप्रकाश नायपॉल यांना त्यांच्या अप्रतिम आणि सर्वस्पर्शी लेखनाबद्दल साहित्यविषयक नोबेल पारितोषिक जाहीर.

२००४ : ‘लक्ष्य’ या वैमानिकरहित व पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या विमानाची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

२००५ : इंग्लंडचा अँड्रयू फ्लिंटॉफ आणि दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस या अष्टपैलू खेळाडूंनी ‘क्रिकेट ऑस्कर’ अशी गणना झालेला ‘इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल’चा ‘मोसमातील सर्वोत्तम खेळाडू’ या पुरस्काराचा बहुमान संयुक्तपणे पटकावला.

दिनमान -

मेष : गुरुकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

तूळ : कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : जुनी येणी वसूल होतील. व्यवसाय वाढेल.

धनू : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मकर : काहींचा आध्यात्मक कल राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

मीन : प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

loading image
go to top