
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 मे 2021
पंचांग -
बुधवार : वैशाख शुद्ध १, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय सकाळी ६.३७, चंद्रास्त सायंकाळी ७.३४, सूर्योदय : ६.०३, सूर्यास्त : ६.५८, इष्टि, भारतीय सौर वैशाख २२ शके १९४३.
दिनविशेष -
१९०५ - महाराष्ट्रातील विचारवंत, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म. १९४४ पासून चेंबरचे मुखपत्र ‘संपदा’ मासिकाचे ते संपादक होते. ही संस्था ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, ंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’ या नावाने ओळखली जाते.
१९०९ - ‘पुणे अनाथ विद्यार्थी गृह’ या संस्थेची स्थापना. सेवानंद बाळूकाका कानिटकर, वि. गं. केतकर यांनी स्थापन केलेल्या या संस्थेमुळे महाराष्ट्रातील हजारो गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण होऊ शकले. पुढे संस्थेच्या नावातील अनाथ हा शब्द वगळला गेला.
१९९८ - ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक आणि संस्कृत पंडित डॉ. रा. ना. दांडेकर यांना ‘बिर्ला अकादमी ऑफ आर्ट अँड कल्चर’ या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
दिनमान -
मेष : आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मिथुन : शासकीय कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लावू शकाल. आर्थिक सुयश लाभेल.
सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्चिक : जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारतील निर्णय मार्गी लागतील.
धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.
मकर : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल.
कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.
मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
Web Title: Daily Horoscope And Panchang 12th May
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..