esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 ऑक्टोबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 ऑक्टोबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 ऑक्टोबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : आश्विन शुद्ध ८, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय दु. १.२३, चंद्रास्त रा. १२.३७, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१२, दुर्गाष्टमी, सरस्वती बलिदान, एकरात्रोत्सवारंभ, भारतीय सौर आश्विन २१ शके १९४३.

दिनविशेष -

१९९३ - मुंबईत लोकलमधील महिलांच्या डब्याला आग लागल्याने त्यातील महिलांनी जीव वाचविण्यासाठी बाहेर उड्या मारल्या असता त्यातील ४९ महिला विरुद्ध बाजूने येणाऱ्या लोकलखाली चिरडून ठार झाल्या.

२००६ - बांगलादेशातील ग्रामीण बॅंकांच्या संकल्पनेतून छोट्यात छोट्या घटकाचा विकास घडवून आणणारे अर्थतज्ज्ञ महंमद युनूस यांना आणि त्यांच्या ‘ग्रामीण बॅंके’ला शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर.

२००६ - जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्‍यपद पटकावून रशियाचा व्लादिमीर क्रामनिक विश्‍वविजेता बनला. त्याने बल्गेरियाच्या वेसेलिन टोपालोव्ह याचा ८.५ विरुद्ध ७.५ असा पराभव केला.

२०१५ - मराठी रंगभूमीवरील नाट्यकर्मींना देण्यात येणारे मानाचे ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ चतुरस्र अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर.

दिनमान -

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रतिष्ठा लाभेल.नवीन परिचय होतील.

वृषभ : वादविवाद टाळावेत. गुरुकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वाहने जपून चालवावीत.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

तूळ : हितशत्रूंवर मात कराल. प्रवास सुखकर होतील.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनू : मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ प्रमाण समाधानकारक राहील.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे दुपारनंतर पार पडतील.

कुंभ : काहींची बौद्धिक प्रगती होईल. नवीन परिचय होतील.

मीन : प्रतिष्ठा लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

loading image
go to top