esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

सोमवार : भाद्रपद शुद्ध ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय दुपारी १२.२४, चंद्रास्त रात्री ११.४३, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३७, ज्येष्ठागौरी पूजन, अमुक्ता भरणव्रत, सूर्याचा उत्तरा नक्षत्रप्रवेश, वाहन म्हैस, भारतीय सौर भाद्रपद २२ शके १९४३.

दिनविशेष -

१९७१ : मराठी रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन. ‘आग्य्राहून सुटका’ मधील औरंगजेब, ‘आंधळ्यांची शाळा’मधील मनोहर या त्यांच्या भूमिका गाजल्या. अमृतमंथन, कुंकू, शेजारी, सावकारी पाश या चित्रपटांत त्यांनी प्रभावी भूमिका केल्या.

१९९९ : जम्मू-काश्‍मीरमधील राजौरी भागात अतिरेक्‍यांशी लढताना पुण्यातील कॅप्टन नितीन प्रकाश चव्हाण धारातीर्थी पडले.

२००३ : ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना २००३ चा तानसेन पुरस्कार तर प्रसिद्ध मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमारगंधर्व पुरस्कार जाहीर.

२००४ : रॉजर फेडररने लेटन ह्युईटला सरळ सेटमध्ये पराभूत करून अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले.. एका वर्षात तीन ग्रॅंडस्लॅम विजेतीपदे मिळविण्याची कामगिरी फेडररने केली. त्याने ऑस्ट्रेलियन आणि विंबल्डन स्पर्धा जिंकली आहे.

दिनमान -

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृषभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारीतील निर्णय मार्गी लागतील.

मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. कोणालाही जामीन राहू नका.

कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : कौटुंबिक सौख्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

तुळ : गुरूकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. वैचारिक प्रगती होईल.

धनु : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर : आर्थिक लाभ होतील. काहींना महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : सहकार्याची अपेक्षा नको. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.

loading image
go to top