आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 December 2020

पंचांग -
सोमवार - कार्तिक कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६.५९ सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय सकाळी ७.२८, चंद्रास्त सायंकाळी ५.४६, दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या, (अमावास्या समाप्ती रात्री ९.४६), अन्वाधान, पारशी अमर्दाद मासारंभ, (खग्रास सूर्यग्रहण, भारतातून दिसणार नसल्याने वेधादी नियम पाळू नयेत),  भारतीय सौर मार्गशीर्ष २३ शके १९४२.

पंचांग -
सोमवार - कार्तिक कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६.५९ सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय सकाळी ७.२८, चंद्रास्त सायंकाळी ५.४६, दर्श अमावास्या, सोमवती अमावास्या, (अमावास्या समाप्ती रात्री ९.४६), अन्वाधान, पारशी अमर्दाद मासारंभ, (खग्रास सूर्यग्रहण, भारतातून दिसणार नसल्याने वेधादी नियम पाळू नयेत),  भारतीय सौर मार्गशीर्ष २३ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९७७ :  नामवंत कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते ग. दि. माडगूळकर यांचे निधन. त्यांनी लिहिलेल्या गीतरामायणामुळे त्यांना महाराष्ट्राचे वाल्मीकी म्हणून ओळखले जाते.
१९८४ : संपूर्ण जुळणी भारतातच झालेल्या पहिल्या मिग-२७ विमानाचे यशस्वी उड्डाण.
१९८६ : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन. त्यांचे निशांत, मंथन, भूमिका, जैत रे जैत, मिर्च मसाला, गमन, चक्र, उंबरठा इ. चित्रपट  लोकप्रिय झाले.
१९९५ : गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ भावगीतगायक गजानन वाटवे यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांना ‘गदिमा पुरस्कार’ प्रदान.
१९९८ : बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ज्योतिर्मय सिकदरने भारताला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

दिनमान -
मेष :
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्‍यता. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
वृषभ : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. वरिष्ठांची कृपा लाभेल.
मिथुन : प्रियजनांसाठी खर्च कराल. प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्य चांगले राहील.
कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल.
सिंह : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शासकीय क्षेत्रातील व्यक्‍तींना दिवस चांगला आहे.
कन्या : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. एखादी गुप्त वार्ता समजेल.
तुळ : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. आरोग्य चांगले राहील.
वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लागतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वादविवाद टाळावेत.
मकर : नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. काहींना महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ : नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
मीन : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 14th December 2020