esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : आषाढ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय सकाळी ९.४६, चंद्रास्त रात्री १०.४०, भद्रा, भारतीय सौर आषाढ २३ शके १९४३.

दिनविशेष -

१८५६ : समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म. ‘केसरी’चे पहिले संपादक, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. ‘सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक म्हणून ते गाजले.

१९२० : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे गुणविशेष त्यांच्यामध्ये प्रकर्षाने दिसतात.

१९७५ : आपल्या अजोड संगीताने संगीतक्षेत्रात सुवर्णपर्व निर्माण करणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि प्रतिभावंत संगीतकार मदनमोहन यांचे निधन.

२००३ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंह बरबीरसिंह ठाकूर ऊर्फ रज्जूभय्या यांचे निधन.

दिनमान -

मेष : तुमचे निर्णय योग्य ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. हितशत्रुंवर मात कराल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

सिंह : नवा मार्ग, नवी दिशा सापडेल. काहींना मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

तुळ : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. सार्वजनिक कामात यश लाभेल.

धनु : निर्णय योग्य ठरतील. एखादी भाग्यकारक घटनाघडेल.

मकर : सहकार्याची अपेक्षानको. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.

कुंभ : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. उत्साह वाढेल.

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

loading image