esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 ऑक्टोबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 ऑक्टोबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 ऑक्टोबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : आश्विन शुद्ध ९, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय दु. २.१६, चंद्रास्त रात्री १.३८, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.११, आयुध नवमी, महानवमी, सरस्वती विसर्जन ९.५३ नं., भारतीय सौर आश्विन २२ शके १९४३.

दिनविशेष -

जागतिक निशाण दिन

१९९४ - ब्रिटनमधील भारतीय वंशाचे नामवंत लेखक विक्रम सेठ यांना त्यांच्या ‘अ सुटेबल बॉय’ या महाकादंबरीबद्दल ‘राष्ट्रकुल लेखक’ पुरस्कार मिळाला.

१९९८ - हकीम, वैद्य आणि नोंदणीकृत इतर वैद्यकीय व्यावसायिक यांना वैद्यकीय व्यवसाय करताना औषधशास्त्राच्या भारतीय पद्धतीबरोबरच ‘ॲलोपॅथी’चा वापर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी.

१९९८ - विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्यकुमार सेन यांना अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर. हा बहुमान मिळविणारे ते सहावे भारतीय आहेत. अर्थशास्त्र या विषयातील हा पुरस्कार मिळविणारे ते आशियातील पहिले तज्ज्ञ आहेत.

दिनमान -

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

वृश्‍चिक : मनोबल वाढविणारी घटना घडेल. कामात सुयश लाभेल.

धनू : कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.

कुंभ : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

loading image
go to top