esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : आषाढ शुद्ध ५/६, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय सकाळी १०.४१, चंद्रास्त रात्री ११.१८, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१३, कुमारषष्ठी, भारतीय सौर आषाढ २४ शके १९४३.

दिनविशेष -

१९५५ - मानवी शांततेसाठी हिरिरीने प्रयत्न करीत असल्याबद्दल पंतप्रधान पंडित नेहरूंना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च मानाचा किताब राष्ट्राध्यक्ष डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रपतिभवनात बहाल केला.

१९६२ - शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणाऱ्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.

२००४ - ज्येष्ठ स्त्री रोगतज्ज्ञ, समाजसेविका, तसेच केईएम रुग्णालय आणि ‘सकाळ’च्या संचालिका डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. प्रसूतिशास्त्र, बालआरोग्य, ग्रामीण व नागरी आरोग्य आणि कुटुंबनियोजन या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली होती. भारत सरकारचा ‘पद्मभूषण’, तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या रॅमन मॅगेसेसे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

दिनमान -

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततिसौख्य लाभेल.

मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. अनपेक्षितपणे एखादी मोठा खर्च संभवतो.

वृश्‍चिक : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु : नोकरीत उत्तम स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरूकृपा लाभेल.

कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने सावकाश चालवावीत.

मीन : वैवाहिक जीवनात स्वास्थ्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.

loading image