esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार : मार्गशीर्ष शुद्ध २, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ७ सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय सकाळी ८.३१, चंद्रास्त सायंकाळी ७.४७, धनुर्मासारंभ, चंद्रदर्शन, भारतीय सौर मार्गशीर्ष २५ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार : मार्गशीर्ष शुद्ध २, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ७ सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय सकाळी ८.३१, चंद्रास्त सायंकाळी ७.४७, धनुर्मासारंभ, चंद्रदर्शन, भारतीय सौर मार्गशीर्ष २५ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८५४ : भारतातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची पुणे येथे स्थापना. हे अशा प्रकारचे भारतातील पहिले महाविद्यालय आहे. शतकभर प्रचलित असलेले ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पूना’ (सी.ओ.इ.पी.) हे नाव महाविद्यालयाने १९११ मध्ये धारण केले.
१९७२ : पुण्याच्या पीडीए संस्थेने भरत नाट्यमंदिरात ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.
२००३ : टाटा उद्योगसमूहातील ताजमहाल या मुंबईतील पंचतारांकित हॉटेलच्या स्थापनेस १०० वर्षे पूर्ण झाली. या हॉटेलच्या उभारणीचे स्वप्न जमशेदजी टाटा यांनी पाहिले होते.

दिनमान -
मेष :
तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरूकृपा लाभेल.
वृषभ : अचानक धनलाभ संभवतो. एखादी गुप्त वार्ता समजेल.
मिथुन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आरोग्य चांगले राहील.
कर्क : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांसाठी खर्च कराल.
सिंह : प्रवासाचे बेत ठरतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. 
तुळ : आत्मविश्‍वास व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. प्रसिद्धी लाभेल.
वृश्‍चिक :  दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
धनु : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वादविवाद टाळावेत.
कुंभ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल.
मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.

Edited By - Prashant Patil

loading image