esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : आषाढ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय सकाळी ११.३६, चंद्रास्त रात्री ११.५७, विवस्वत सप्तमी, भारतीय सौर आषाढ २५ शके १९४३.

दिनविशेष -

१९९६ : ‘स्वाध्याय’ परिवाराचे संस्थापक व क्रियाशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर.

१९९८ : गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याचा अधिकार आहे, असा निर्णय घेतल्याची माहिती गुजरातच्या शिक्षण राज्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत दिली.

२००० : माजी हॉकीपटू अरुणकुमार मित्रा यांचे कलकत्ता येथे निधन.

२००३ : टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचे टिळक सन्मान पारितोषिक आंध्र प्रदेशातील ‘इनाडू’ या वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक आणि ‘ई-टीव्ही’ चे प्रमुख रामोजी राव यांना जाहीर.

दिनमान -

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृषभ : नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : प्रॉपर्टीचे ेनवीन प्रस्ताव समोर येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क : हितशत्रुंवर मात कराल. महत्त्वाची कामे शक्यतो विचारपूर्वक करावीत.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

तुळ : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक : पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मीन : भागीदारीतील निर्णय मार्गी लागतील. इतरांवर प्रभाव राहील.

loading image