आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 नोव्हेंबर 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 नोव्हेंबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 नोव्हेंबर 2021

पंचांग :

मंगळवार : कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दुपारी ४.११, चंद्रास्त पहाटे ४.५०, भौमप्रदोष, भारतीय सौर कार्तिक २५ शके १९४३.

दिनविशेष :

१९९४ : नामवंत टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा टेनिसमधून निवृत्त.

१९९६ : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी-मुंबई मार्गाचा शुभारंभ.

१९९६ : ‘पर्सन ऑफ प्राइड’ या चतुरंग प्रतिष्ठान संस्थेच्या पुरस्कारासाठी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड.

२०१४ : रांची येथे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पाचव्या एकदिवसीय सामन्यातही पराभूत करून ५-० असा व्हॉइटवॉश दिला.

दिनमान :

मेष : मानसिक अस्वस्थता राहाणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील.

वृषभ : अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रमैत्रिणींचे विशेष सहकार्य लाभेल.

मिथुन : व्यवसायात काही बदल करू शकाल. महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होतील.

कर्क : अनुकूलता लाभेल. मानसिक अस्वस्थता संपेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : मानसिक अस्वस्थता राहाणार आहे. कामामध्ये चुका होण्याची शक्यता आहे.

कन्या : हितशत्रूंवर मात कराल. प्रवास सुखकर होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. विरोधकांवर मात कराल.

वृश्‍चिक : मुलामुलींची प्रगती होईल. सौख्य व समाधान लाभेल.

धनू : गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील.

मकर : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. अनेक कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभ संभवतो. उधारी, उसनवारी वसूल होईल.

मीन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

loading image
go to top