esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : आषाढ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय दुपारी १२.३२, चंद्रास्त रात्री १२.३७, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१३, दुर्गाष्टमी, करिदिन, भारतीय सौर आषाढ २६ शके १९४३.

दिनविशेष -

१९८९ : पानशेत धरणफुटीच्या चौकशीमुळे गाजलेले न्यायमूर्ती वि. अ. नाईक यांचे निधन.

१९९२ : ‘प्रभात’च्या ‘माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन.पुणे महापालिकेतर्फे त्यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ देण्यात आला होता.

२००० : ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यकलाकार वैजयंतीमाला बाली यांना ‘भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर.

२००१ : ज्येष्ठ नाट्यसमीक्षक वा. य. गाडगीळ यांचे निधन.

२००३ : ज्येष्ठ कामगार नेते आर. जे. मेहता यांचे निधन. कामगारांसाठी तळमळीने झटणारा नेता, समाजसेवक तसेच कायदेपंडित अशी त्यांची ख्याती होती.

२००४ : बारामती येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. वर्धमान माणिकचंद कोठारी यांचे निधन. ऑगस्ट क्रांती संग्रामामध्ये त्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवले होते.

दिनमान -

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. आरोग्याच्या तक्रारी येतील.

वृषभ : वाहने जपून चालवावीत. कामे मार्गी लागतील.

मिथुन : आरोग्य चांगले राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : आर्थिक सुयश लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

तुळ : वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कामे दुपारनंतर पार पडतील.

वृश्‍चिक : दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता. जिद्द वाढेल.

धनु : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील.

मकर : जिद्दीनेे कार्यरत राहाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ : वाहने जपून चालवावीत. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

loading image