esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 18 मे 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 18 मे 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : वैशाख शुद्ध ६, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ११.०८, चंद्रास्त रात्री २४.३६, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.०१, गंगोत्पत्ती, गंगापूजन, श्रीनृसिंह नवरात्रारंभ, भारतीय सौर वैशाख २८ शके १९४३.

दिनविशेष -

१९९६ - ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांना व्यंगचित्रकलेच्या क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल हरियाना सरकारकडून ‘शरद जोशी हास्य सन्मान’ हा पुरस्कार जाहीर.

१९९७ - भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई रघुनाथराव गोखले यांचे निधन. ‘राजा हरिश्‍चंद्र’ हा भारतातील पहिला मूकपट असला तरी प्रत्यक्ष स्त्री कलाकार भूमिका असलेला हा पहिलाच मूकपट होता. त्यामुळे रजतपटावरील पहिल्या महिला कलाकार होण्याचा मान त्यांना मिळाला.

१९९८ - पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. ही कामगिरी करणारा तो पहिला मराठी युवक असून एव्हरेस्टवर चढाई करणारी ‘टाटा एव्हरेस्ट इंडिया ९८’ ही पहिली नागरी मोहीम ठरली.

१९९९ - प्रसिद्ध कायदेपंडित, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बॅ. राजा भोसले यांचे निधन.

दिनमान -

मेष : अपेक्षित गाठीभेटी होतील. अपेक्षित पत्र व्यवहार होतील.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.

कर्क : तुमचे निर्णय अचूक ठरतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोरंजनाकडे कल राहील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

तुळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत चांगली स्थिती राहील.

वृश्‍चिक : अपेक्षित गाठीभेटी होतील. शासकीय कामे पार पडतील.

धनु : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. एखादी चिंता लागून राहील.

मकर : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मीन : संततिसौख्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.