esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 1 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 1 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : श्रावण कृष्ण १०, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४७, चंद्रोदय रात्री १.४५, चंद्रास्त दुपारी २.३६, बुधपूजन, भारतीय सौर भाद्रपद १० शके १९४३.

दिनविशेष -

१९९५ - नवी दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा आंबेडकर फेलोशिप (तत्त्वज्ञान) राष्ट्रीय पुरस्कार बेलसर येथील शिक्षक दिगंबर चिमाजी कदम यांना जाहीर.

१९९८ - जमिनीवरून हवेत मारा करण्याच्या आकाश या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी यशस्वी चाचणी घेतली. त्याची रात्री चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

१९९९ - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांचे निधन.

२००२ - ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. बी. व्ही. कारंथ यांचे निधन. रंगभूमीवर ते केवळ दिग्दर्शक म्हणूनच वावरले नाहीत, तर लेखक, संगीतकार, अभिनेता म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली.

२००४ - शिखांचा धर्मग्रंथ ‘श्री गुरु ग्रंथसाहिब’च्या प्रतिष्ठापनेस चारशे वर्षे पूर्ण. हा ग्रंथ अमृतसरला हरिमंदिरसाहिब गुरुद्वारात स्थापित करण्यात आला आहे.

दिनमान -

मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

कर्क : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

सिंह : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. नवीन परिचय होतील.

तुळ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनु : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. हितशत्रुंवर मात कराल.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी ेलागतील. नवीन परिचय होतील.

मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

loading image
go to top