आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २० जुलै

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

पंचांग -
सोमवार - आषाढ कृ. ३० चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ७.१४, दर्श अमावास्या, भारतीय सौर २९, शके १९४२.

पंचांग -
सोमवार - आषाढ कृ. ३० चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ७.१४, दर्श अमावास्या, भारतीय सौर २९, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९०८ - बडोद्याचे महाराज सयाजीराव महाराज यांच्या पुढाकाराने ‘बॅंक ऑफ बडोदा’ची स्थापना.
१९१९ - एव्हरेस्टवर पहिली यशस्वी चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक एडमंड हिलरी यांचा जन्म. त्यांनी रबरी होडीतून गंगेच्या मुखापासून गंगोत्रीपर्यंतचा प्रवास केला होता.
१९३७ - बिनतारी संदेशवहनाच्या विकासात महत्त्वाचे संशोधन करणारे इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांचे निधन. त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांना १९०९ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते.
१९४३ - कादंबरीकार, साहित्य, समीक्षक वामन मल्हार जोशी यांचे निधन. ‘रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीमुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यानंतर ‘आश्रमहरिणी’, ‘नलिनी’, ‘सुशीलेचा देव’ इ. कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
१९६९ - अमेरिकेच्या अपोलो-११ यानातून गेलेले नील आर्मस्ट्राँग व एडविन ऑल्ड्रिन या दोन अंतराळवीरांनी आपले चांद्रयान चंद्रावर उतरविले. 
१९७२ - विख्यात पार्श्वगायिका गीता दत्त यांचे निधन. त्यांची ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले’, ‘ऐ लो मैं हारी पिया’, ‘प्रीतम आन मिलो’, ‘नन्हीं परी सोने चली’, यांसारखी कैक गाणी लोकांनी उचलून धरली.
२००० - अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
संपूर्ण दिवस अनुकूल आहे. मात्र, शुभ कार्यास दिवस चांगला नाही.
वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मानसिक उत्साह वाढेल.शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.
मिथुन : आर्थिक कामे दुपारी ३ नंतर करावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. व्यवसायात चांगल्या घटना घडतील.
सिंह : महत्त्वाची कामे दुपारी ३ पूर्वी उरकून घ्यावीत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभणार.
कन्या : तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.
तुळ : तुमचा प्रभाव पडेल. कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल.
वृश्‍चिक : व्यवसायात चांगली स्थिती राहील. आरोग्य चांगले राहणार आहे.
धनु : शासकीय कामे पुढे ढकलावीत. शुभ कामे आज नकोत.उत्साह, उमेद वाढेल. 
मकर : एखादी मानसिक चिंता राहील. अडचणीवर मात कराल.उत्साह, उमेद वाढेल. 
कुंभ : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. आर्थिकबाबतीत यश लाभेल.
मीन : हाती घेतलेल्या कामात यश लाभणार आहे. उत्साह, उमेद वाढेल. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 20th July 2020