आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 मे 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 मे 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : वैशाख शुद्ध ९, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६, सूर्यास्त ७.०२, चंद्रोदय दुपारी १.५७, चंद्रास्त रात्री २.४१, सीता नवमी, भारतीय सौर वैशाख ३१ शके १९४३.

दिनविशेष -

जागतिक दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन

१९९१ : माजी पंतप्रधान व काँग्रेस (आय) चे अध्यक्ष राजीव गांधी यांचे श्रीपेरांबदूर येथे निवडणूक प्रचारसभेत बॉम्बस्फोट झाल्याने निधन. त्यांनी भारतातील प्रशासन, संशोधन, उद्योगधंदे यांचे मोठ्या प्रमाणावर संगणकीकरण केले. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

१९९२ : एक हजार किलोटन क्षमतेच्या अणुबाँबची चीनमध्ये चाचणी. हा जगातील सर्वांत शक्तिशाली अणुस्फोट आहे.

१९९४ : ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंडिया’ सुश्‍मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब पटकावला. हा किताब पटकावणारी ही पहिलीच भारतीय आहे.

१९९६ : सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विधानसभेचे अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांचा ‘विजयरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

दिनमान -

मेष : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. थोरामोठ्यांचे परिचय होतील.

कर्क : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. शासकीय कामे पार पडतील.

सिंह : जीवनात वैचारिक प्रगती होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

तुळ : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील.

वृश्‍चिक : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

धनु : निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. कामात यश लाभेल.

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक प्रगती होईल.

loading image
go to top