
पंचांग -
शुक्रवार : पौष शुद्ध ९, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय दुपारी १.१२, चंद्रास्त रात्री २.१९, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२१, भारतीय सौर माघ १ शके १९४२.
पंचांग -
शुक्रवार : पौष शुद्ध ९, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय दुपारी १.१२, चंद्रास्त रात्री २.१९, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२१, भारतीय सौर माघ १ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१८८५ : पुण्याचे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु. शिक्षण आणि विद्यार्थ्यांची गौरवशाली परंपरा असणारे हे महाविद्यालय आहे.
१९४७ : भारताच्या घटना समितीत घटनेची रुपरेषा कशी असावी या विषयीचा ठराव मंजूर करण्यात आला.
१९९६ : हिंदुस्थान एरोनॉटिक्स या कंपनीने नौदलासाठी तयार केलेल्या नमुना स्वरुपातील अत्याधुनिक हलक्या हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी.
२००० : जम्मू विभागातील अखनूर भागात भारताचे ठाणे बळकावण्याचा पाकिस्तानी लष्कराचा डाव भारतीय जवानांनी हाणून पाडला. या चकमकीत २५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले.
२००१ : ‘आयएनएस मुंबई’ व कोरा वर्गातील ‘किर्श’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल.
२००४ : जम्मू-काश्मीर लाईट इन्फंट्रीचे लेफ्टनंट त्रिवेणीसिंग यांना मरणोत्तर ‘अशोक चक्र’ जाहीर.
दिनमान -
मेष : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल.
वृषभ : आज आपणाला प्रतिकूलतेला सामोरे जावे लागेल. मनोबल कमी राहील.
मिथुन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लावू शकाल. नवीन परिचय होतील.
कर्क : नोकरीत बढतीची शक्यता आहे. मान व प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. व्यवसायाचे प्रश्न सुटतील.
कन्या : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वृश्चिक : मानसिक अस्वस्थता जाणवतेल. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. पत्र व्यवहार होतील.
मकर : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मीन : काहींना प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
Edited By - Prashant Patil