esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 22 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - अधिक अश्‍विन शु.6, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.31, चंद्रोदय स. 11.12, चंद्रास्त रा. 10.44, भारतीय सौर 31, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 22 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - अधिक अश्‍विन शु.6, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.31, चंद्रोदय स. 11.12, चंद्रास्त रा. 10.44, भारतीय सौर 31, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९२३ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व ख्यातनाम उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म. 
१९५५ - दूरचित्रवाणीचं सर्वप्रथम व्यावसायिक प्रसारण इंग्लंडमध्ये सुरु.
१९९१ - रंगभूमीवरील आणि हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत ३०० चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. ‘सीता’, ‘पृथ्वीवल्लभ’, ‘हम एक है’, ‘बावर्ची’, ‘खिलौना’ या हिंदी चित्रपटांतील ,‘अयोध्येचा राजा’, ‘मोरुची मावशी’, ‘सीता स्वयंवर’, ‘माया बाजार’, ‘जशास तसे’ या मराठी चित्रपटातील व ‘कीचकवध’, ‘भाऊबंदकी’, ‘खडाष्टक’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. 
१९९२ - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वास्तुतंत्रज्ञ व मुंबईचे माजी शेरीफ ज. ग. बोधे यांचे निधन. मुंबईचे ब्रेबॉर्न स्टेडिअम, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचा डोम, पुण्यातील लकडी पूल ही त्यांची बांधकामे. 
१९९४ - जुन्या पिढीतील नामवंत भावगीतगायक जी. एन. जोशी यांचे निधन. एचएमव्ही या कंपनीसाठी काम करताना त्यांनी अनेक गायकांच्या ध्वनिमुद्रिका काढून त्यांना प्रकाशात आणले.
१९९९ - बृहन्मुंबई पोलिस दलातील उपनिरीक्षक बाळासाहेब रामचंद्र घाडगे यांनी डोव्हर इंग्लिश खाडी ते डॅजेनिस किनारा हे ३५ किलोमीटरचे अंतर ९ तास ५२ मिनिटांत विक्रमी वेळेत पार करून भारतीय जलतरणाच्या इतिहासात नव्या पराक्रमाची नोंद केली.

दिनमान -
मेष -
महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ - आरोग्य उत्तम राहील. बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल. विरोधकांवर मात कराल.
मिथुन - विरोधकांवर मात कराल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क - मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 
सिंह - योग्य कामासाठी खर्च कराल. व्यवसायात प्रगती होईल. शासकीय कामात यश मिळेल.
कन्या - मनोबल वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सुसंधी प्राप्त होईल.
तुळ - आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. सौख्य लाभेल. नोकरीत चढ-उताराची शक्यता आहे.
वृश्‍चिक - आरोग्य उत्तम राहील. सौख्य लाभेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
धनु - महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
मकर - वैवाहिक सौख्य लाभेल. व्यवसायाची वाढ होईल. शेअर्समध्ये धाडस नको.
कुंभ - सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 
मीन - कलेच्या क्षेत्रात यश लाभेल. आर्थिक लाभ होतील. पत्र व्यवहार पुढे ढकलावेत.

Edited By - Prashant Patil