esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 23 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 23 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : आषाढ शुद्ध १४, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सायं. ६.४८, चंद्रास्त स. ६.४५, गुरुपौर्णिमा व्यासपूजन, मन्वादि, संन्यासिनां चातुर्मास्यारंभ, अन्वाधान, पौर्णिमा प्रारंभ स. १०.४४, भारतीय सौर श्रावण १ शके १९४३.

दिनविशेष -

वनसंवर्धन दिन

१८५६ : थोर नेते, भगवद्‌गीतेचे भाष्यकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी येथे जन्म. त्यांचे प्रमुख ग्रंथ ‘गीतारहस्य’, ‘ओरायन’, ‘आर्क्‍टिक होम इन द वेदाज’, ‘वेदांगज्योतिष’ हे होत.

१८९८ : बंगाली साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ताराशंकर बंदोपाध्याय यांचा जन्म. १९६७ मध्ये ‘गणदेवता’ या कादंबरीची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड. भारत सरकारने ‘पद्मविभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला होता.

१९०६ : स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म.

१९१७ : नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत ऊर्फ माई भिडे यांचा जन्म. छोटा गंधर्व यांच्याबरोबर मानापमान, सौभद्र इ.नाटकातून व जगाच्या पाठीवर, आम्ही जातो आमुच्या गावा इ. सिनेमातून त्या चमकल्या.

१९८३ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या कल्पक्कम अणुवीज केंद्राचे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्‌घाटन.

दिनमान -

मेष : उत्साह व उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील.

कर्क : वाहने सावकाश चालवावीत. विरोधकांवर मात कराल.

सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कन्या : सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ : हाती घेतलेल्या कामात सुयश. आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल.

वृश्‍चिक : उधारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

धनू : रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : काहींची आध्यात्मिक प्रगती. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.

मीन : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

loading image