आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २३ मार्च २०२१

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २३ मार्च २०२१

पंचांग -
मंगळवार : फाल्गुन शुद्ध ९, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.३७ सूर्यास्त ६.४५, चंद्रोदय दुपारी १.३४, चंद्रास्त पहाटे ३.१३, भारतीय सौर चैत्र २ शके १९४३.

दिनविशेष -
१९१० : विख्यात संसदपटू,  समाजवादी नेते व व्यासंगी लेखक डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म. त्यांनी १९३२ मध्ये ‘मिठाचा सत्याग्रह’ या विषयावर बर्लिन विद्यापीठाची डॉक्‍टरेट मिळविली होती.
१९३१ : स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक भगतसिंग, शिवराम हरी राजगुरू व सुखदेव यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. 
१९८० : प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत अजिंक्‍यपद मिळविणारा तो पहिला भारतीय होय.
१९९८ : महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीतर्फे ‘वली दख्ती’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध कवी मजरुह सुलतानपुरी यांनी स्वीकारला.
१९९९ : ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना ‘पद्मविभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना ं‘पद्मश्री’ सन्मान प्रदान करण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनमान -
मेष :
उत्साह, उमेद वाढेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे.
वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. शुभ कामासाठी दिवस चांगला आहे.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. आर्थिक सुयश लाभेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
कर्क : महत्त्वाची कामे दुपार नंतर पार पडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
सिंह : नवीन गाठीभेटी होतील. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत.
कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.
तुळ : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
धनु : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : गुंतवणुकीची कामे पुढे ढकलावीत. मित्रांचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com