esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २६ जुलै

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार - श्रावण शु. 6, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय स.11.27, चंद्रास्त रा.11.47, भारतीय सौर 4, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : २६ जुलै
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - श्रावण शु. 6, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.12, चंद्रोदय स.11.27, चंद्रास्त रा.11.47, भारतीय सौर 4, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन
१८४४ - कायदेपंडित व शिक्षणतज्ज्ञ गुरुदास बॅनर्जी यांचा जन्म. १८७८ मध्ये टागोर व्याख्यानमालेतील ‘हिंदू लॉ ऑफ मॅरेज अँड स्त्रीधन’ या विषयावर त्यांनी दिलेली व्याख्याने मौलिक ग्रंथ मानतात.
१८५६ - विख्यात लेखक, नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म.
१८७४ - कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म. त्यांनी केलेल्या समाजसुधारणांमुळे त्यांना ‘राजर्षी’ म्हणून ओळखण्यात येत असे.
१८९१ - बंगाली प्राच्यविद्या संशोधक राजेंद्रलाल (राजा) मित्र यांचे निधन. १८८५ मध्ये ते एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष झाले. भारतीय शिल्पकला, वास्तुकला, सामाजिक विषयांवरील निबंध, संस्कृत ग्रंथांचे विवेचन, संस्कृत हस्तलिखितांचे सूचिग्रंथ ही त्यांची ग्रंथसंपदा.
१९४४ - पेहलवी राजवंशाचा संस्थापक, आधुनिक इराणचा शिल्पकार रेझाशाह पेहलवी यांचे निधन. ट्रान्स इराणियन रेल्वे आणि राष्ट्रीय बॅंक या त्यांच्या महत्त्वाच्या देणग्या होत. त्यांनी पर्शिया या पारंपरिक नावाऐवजी देशाचे इराण असे नामकरण केले.
१९५६ - इजिप्तचे अध्यक्ष कर्नल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. 
१९९४ - विख्यात सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना ‘राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार’ जाहीर.
१९९८ - सन १९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल भारताचा ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा ‘चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान.
१९९९ - क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड.

दिनमान -
मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. संततिसौख्य लाभेल.आरोग्य चांगले राहील.
वृषभ : वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.मानसिक उत्साह वाढेल.
मिथुन : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. तुमची वैचारिक प्रगती होईल.
कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल.
सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वस्तू हरविणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
कन्या : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल.
तूळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी मिळेल.
वृश्‍चिक : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल.
धनू : प्रवासात दक्षता घेण्याची गरज आहे. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे.
मकर : कामाचा ताण जाणवणार आहे. जबाबदारी वाढणार आहे.
कुंभ : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
मीन : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल.

Edited By - Prashant Patil