आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 नोव्हेंबर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

पंचांग -
गुरुवार - कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.४८ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ३.३१, चंद्रास्त पहाटे ४.०८, भागवत एकादशी, चातुर्मास्य समाप्ती, तुलसी विवाहारंभ, पंढरपूर यात्रा, भारतीय सौर मार्गशीर्ष ५ शके १९४२.

पंचांग -
गुरुवार - कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, सूर्योदय ६.४८ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय दुपारी ३.३१, चंद्रास्त पहाटे ४.०८, भागवत एकादशी, चातुर्मास्य समाप्ती, तुलसी विवाहारंभ, पंढरपूर यात्रा, भारतीय सौर मार्गशीर्ष ५ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९८५ : रविकिरण मंडळातील कवी यशवंत यांचे निधन. त्यांचे संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढरकर. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले. 
१९९४ : मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजविणारे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर  यांचे निधन. ‘नेताजी पालकर’, ‘बहिर्जी नाईक’, ‘थोरातांची कमळा’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘पावन खिंड’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘महाराणी येसूबाई’, ‘मराठा तितुका मेळवावा’ यासारख्या आपल्या चित्रपटांच्याद्वारा शिवकालीन पार्श्‍वभूमीवरील ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा त्यांनी निर्माण केली..
१९९७ : अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे  प्रसिद्ध शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ,  आणि संरक्षणमंत्र्यांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना देशाचा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
२००४ : ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांना तानसेन पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
नको त्या गोष्टीवर वेळ व पैसा वाया जाईल. कर्मचारी वर्गाबरोबर मतभेद संभवतो. 
वृषभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील. अपेक्षित गाठीभेटी होतील.
मिथुन : तुमच्या प्रतिष्ठेत भर टाकणारी एखादी घटना घडेल.  मानसन्मानाचे  योग येतील. 
कर्क : काहींना भाग्यकारक अनुभव येतील. काहींना गुरूकृपा लाभेल.
सिंह : कामाच्या ठिकाणी होणाऱ्या चुका टाळाव्यात. मानसिक अस्वस्थता जाणवेल. 
कन्या : मनोबल, जिद्द व चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. 
तुळ : काहींना इस्पितळाला भेट द्यावी लागेल.  खर्च वाढतील. 
वृश्‍चिक : प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. 
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीतील व्यक्‍तींना सुसंधी लाभेल. 
मकर : घरी पाहुणे येण्याची शक्‍यता आहे. अनपेक्षितपणे एखादी बातमी समजेल. 
कुंभ : मनोबलाच्या जोरावर अनेक कामात यश मिळवाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : अडचणी कमी होतील. कामे मार्गी लागतील. अनपेक्षित एखादा खर्च होईल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 26th November 2020