esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 एप्रिल 2021

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 एप्रिल 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : चैत्र कृष्ण ३, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ६.५४, चंद्रोदय रात्री ९.३१, चंद्रास्त सकाळी ७.५५, दुसरी तीज, भारतीय सौर वैशाख ९ शके १९४३.

दिनविशेष -

आंतरराष्ट्रीय नृत्यदिन

१८४८ : महान भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा यांचा जन्म.

१९०९ : महाराष्ट्रातील आधुनिक संत, समाजसुधारक तुकडोजीमहाराज यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव माणिकजी बंडूजी ठाकूर.

१९१९ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चतुरस्र तबलानवाझ उस्ताद अल्लारखा खाँ यांचा जन्म.

१९९५ : नामवंत चित्रपट दिग्दर्शक यशवंत पेठकर यांचे निधन.

१९९७ : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आर. एन. मल्होत्रा यांचे निधन.

१९९८ : घोषवादनाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ संगीतरचनाकार हरी विनायक दात्ये यांचे निधन.

दिनमान -

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.

कर्क : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल.

सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना गुरुकृपा लाभेल.

तूळ : आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनू : प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

मकर : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील.

कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मीन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.