esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 सप्टेंबर 2021 I Horoscope
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : भाद्रपद कृष्ण ८, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय रात्री १२.२७, चंद्रास्त दुपारी १.१९, सूर्योदय ६.२५, सूर्यास्त ६.२३, कालाष्टमी, अष्टमी श्राद्ध, मध्याष्टमी श्राद्ध, भारतीय सौर आश्विन ७ शके १९४३.

दिनविशेष -

१८९० - पंचांगकर्ते ल. गो. ऊर्फ नानाशास्त्री दाते यांचा जन्म. जुने पंचांग म्हणून प्रसिद्ध असलेल्या दाते पंचांगाचे संस्थापक. त्यांनी पंचांग गणित पद्धतीत सूक्ष्मता व अचूकता आणली.

१९०८ - पदार्थ वैज्ञानिक एन्रिको फर्मी यांचा जन्म. न्यूट्रॉन कणांवरील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त.

१९२५ - फ्रान्सचे पंतप्रधान व नोबेल पुरस्काराचे मानकरी लिआँ व्हीक्तॉर ऑग्यूस्त बूर्झ्वा यांचे निधन. त्यांनी प्राप्तिकर, निवृत्तिवेतन, सामाजिक सुरक्षा, विमा योजना इत्यादींबाबत पुरोगामी धोरणाचा पुरस्कार केला. १९१९ मध्ये पॅरिस येथे भरलेल्या शांतता परिषदेतही त्यांनी फ्रान्सचे प्रतिनिधित्व केले व जागतिक शांततेचा पुरस्कार केला. या कार्याबद्दल १९२० चा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला.

१९३२ - मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व साहित्यिक हमीद दलवाई यांचा जन्म.

१९५२ - शिर्डी येथील साई मंदिराच्या कळसाची प्रतिष्ठापना डॉ. रामचंद्रमहाराज पारनेरकर यांच्या हस्ते.

दिनमान -

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कर्क : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : नवीन परिचय होतील. हितशत्रुंवर मात कराल.

कन्या : व्यवसायात नवीन शाखा निर्माण करू शकाल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुळ : गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.

कुंभ : आर्थिक लाभ होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : काहींना प्रवासाचे योग येतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

loading image
go to top