Bhavishya
Bhavishya

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०७ जून

पंचांग -
रविवार - ज्येष्ठ कृ. २  चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.११, चंद्रोदय  रा. ०८.५१ चंद्रास्त  स.०७.१४ भारतीय सौर १७, शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९६९ - पूर्वीच्या पुणे नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी शंकर रामचंद्र ऊर्फ अप्पासाहेब भागवत यांचे निधन. त्यांनी पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून १९१८ पर्यंत काम केले. पावसाचे पाणी वाया जाऊ न देता जमिनीत कसे मुरवावे याचे संशोधन करून ते प्रयोग करीत.
१९७९ - भारताने ‘भास्कर’ हा दुसरा उपग्रह अंतराळात सोडला.
१९९२ - मराठी वाङ्‌मयाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक डॉ. स. गं. मालशे यांचे निधन. त्यांनी १९ व्या शतकावर लिहिलेली ‘गत शतक शोधताना’ आणि ‘तारतम्य’ ही दोन पुस्तके प्रसिद्धीला आली. समीक्षक म्हणून त्यांनी लिहिलेली ‘आवडनिवड’, ‘आगळंवेगळं’, ‘निरक्षीर’ आदी पुस्तके अभ्यासपूर्ण आहेत.
१९९४ - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी महाराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर यांची नियुक्ती. या संघटनेच्या इतिहासात प्रथमच एका भारतीयाची एवढ्या उच्च पदावर नियुक्ती करण्यात आली.
१९९८ - गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष व नाट्यसमीक्षक शशिकांत नार्वेकर यांचे निधन.
१९९८ - साकेगाव (ता. भुसावळ) येथील खानदेश कुष्ठसेवा मंडळाचे सचिव डॉ. ज्ञानदेव चौधरी यांना कुष्ठरोग्यांच्या सेवेबद्दल लेप्रसी युनियन या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे ‘कुष्ठरोग्यांचे कर्मठ स्वयंसेवक’ हा पुरस्कार घोषित.
२००० - लहान मुलांच्या मेळाव्यात अधिक रमणारे ‘मुलांचे नाना’ ज्येष्ठ बालसाहित्यकार गोपीनाथ तळवलकर यांचे निधन.
२००० - कोलंबोच्या उपनगरात हवाई दलाच्या रत्मालन विमानतळाजवळ एलटीटीईच्या आत्मघातकी पथकातील अतिरेक्‍यांनी घडवून आणलेल्या शक्तिशाली मानवी बाँबस्फोटात श्रीलंकेचे औद्योगिक विकासमंत्री सी. व्ही. गुणरत्ने यांच्यासह २१ जण ठार.
२००२ - माजी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांचे निधन.
२००३ - महाराष्ट्राचे माजी राष्ट्रीय कबड्डीपटू बाळासाहेब ऊर्फ विश्‍वनाथ गणपतराव कोंढाळकर यांचे निधन.
२००४ - स्वदेशी बनावटीच्या ‘सारस’ या प्रवासी विमानाची दुसरी चाचणी यशस्वीपणे पार पडली. १४ आसनांची क्षमता असलेल्या या विमानाच्या निर्मितीसाठी १९९१ मध्ये येथील ‘नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी’मध्ये प्रकल्प हाती घेण्यात आला होता.

दिनमान -
मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल.
वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
मिथुन : व्यवसायाच्या संदर्भात काही चांगल्या घटना घडतील. आरोग्य चांगले राहणार आहे.
कर्क : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नातेवाईकांकरिता खर्च करावा लागेल.
सिंह  : बौद्धिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : व्यवसायात प्रगती होईल. मानसिक उत्साह वाढेल.
तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभणार आहे. अपेक्षित फोन होतील.
वृश्‍चिक  : मित्रांच्या आश्‍वासनांवर अवलंबून राहू नका. आरोग्य चांगले राहील.
धनु : व्यवसायात वाढ होईल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
मकर : आरोग्य चांगले राहणार आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
कुंभ  : तुमचे अंदाज अचूक ठरतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मीन : व्यवसायात नवीन तंत्र वापरू शकाल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com