esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 9 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Astrology and Horoscope

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 9 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ६.४०, चंद्रास्त सायंकाळी ६.५३, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१४, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ पहाटे ५.१७, भारतीय सौर आषाढ १८ शके १९४३.

दिनविशेष -

१८१९ : शिवणयंत्राचे संशोधक इलियास होव यांचा जन्म. दुहेरी टाक्‍याच्या तंत्राचा वापर असलेल्या या यंत्राचा शोध मानवी इतिहासातील अतिशय महत्त्वाचा शोध मानला जातो.

१९६८ : संत साहित्याचे गाढे अभ्यासक, सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकर वामन उर्फ सोनोपंत दांडेकर यांचे निधन. मामासाहेब दांडेकर या नावानेही ते परिचित होते. ‘श्री तुकाराम गाथा’ आणि ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ हे ग्रंथ त्यांनी संपादित केले.

१९९५ : महाराष्ट्र राज्याचे पहिले क्रीडा संचालक व शिवछत्रपती पारितोषिक विजेते दिगंबर गोपाळ वाखारकर यांचे निधन. राज्यात स्वतंत्र क्रीडा खाते सुरु करण्यास त्यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले.

१९९७ : विख्यात सतारवादक पंडित रवीशंकर आणि इतिहासतज्ज्ञ रोमिला थापर यांची जपान आर्ट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड.

दिनमान -

मेष : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

वृषभ : आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. नवीत तंत्र अंमलात आणू शकाल.

मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह, उमेद वाढेल.

कर्क : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मकर : हितशत्रुंवर मात कराल. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मन आनंदी राहील.

loading image