esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 एप्रिल 2021
sakal

बोलून बातमी शोधा

sakal rashibhavishya

आजचे राशिभविष्य - 17 एप्रिल 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिनांक : 17 एप्रिल 2021 : वार : शनिवार : चैत्र शुद्ध ५, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.१७, सूर्यास्त ६.५०, चंद्रोदय सकाळी ९.४४, चंद्रास्त रात्री ११.२२, विष्णूचा दोलोत्सव, श्री पंचमी, श्री लक्ष्मी पंचमी, हयव्रत, कल्पादि, भारतीय सौर चैत्र २७ शके १९४३.

दिनविशेष

  • 1790 - थोर शास्त्रज्ञ, अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख पुढारी, मुत्सद्दी, मुद्रक, पत्रकार, लेखक अशा बहुविध व्यक्तिमत्त्वाचे बेंजामिन फ्रॅंकलिन यांचे निधन.

  • 1891 - कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म. चिं. ग.कर्वे यांच्या सहकार्याने "महाराष्ट्र मंडळ कोश' स्थापन करून आठ खंडांचा "महाराष्ट्र शब्दकोश' तयार केला. पुढे दाते-कर्वे या जोडीने "महाराष्ट्र वाक्‍संप्रदाय कोश", "शास्त्रीय परिभाषा कोश', आणि सहा खंडातील "सुलभा विश्‍वकोश' ही कामे पूर्ण केली.

  • 1916 - पंतप्रधान होणाऱ्या जगातील पहिल्या महिला सिरिमाओ भंडारनायके यांचा जन्म.

  • 1980 - आफ्रिकेतील झिंबाब्वे हा देश स्वतंत्र झाला.

  • 1994 - कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी लोकसभा सदस्य रेणू चक्रवर्ती यांचे कलकत्ता येथे निधन.

  • 1997 - ओरिसाचे माजी मुख्यमंत्री व जनता दलाचे ज्येष्ठ नेते बिजू पटनाईक यांचे निधन.

  • 2001 - अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट आणि टेक्‍नॉलॉजीमधील प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला "माल्कम आदिशेषय्या पुरस्कार' जाहीर.

हेही वाचा: साप्ताहिक राशिभविष्य - 11 एप्रिल ते 17 एप्रिल

आजचे दिनमान

मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. आर्थिक सुयश लाभेल.

मिथुन : प्रवास शक्यतो टाळावेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवीन परिचय होतील.

कन्या : काहींना गुरूकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील.

हेही वाचा: ढिंग टांग : थोडे बंद, थोडे चालू!

तुळ : हितशत्रुंवर मात कराल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.

कुंभ : प्रवास सुखकर होतील. संततिसौख्य लाभेल.

मीन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

loading image