
मुकुंद लेले- mukund.lele@esakal.com
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी धाडसी पावले टाकत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा प्रबळ बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेच्या इतर देशांबरोबरच्या आयातशुल्कात (टेरिफ) बदल, महसूलवाढ, खर्चबचत, करकपात, व्यापारी तूट कमी करणे, अमेरिकेत उत्पादननिर्मितीला चालना देणे, अमेरिकी उत्पादनांचा पुरस्कार आदी उपायांचा त्यात समावेश आहे, परंतु त्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळणार का? सध्याच्या घडामोडी पाहता, अमेरिकी अर्थव्यवस्थेपुढे मंदीचे संकट उभे राहण्याची भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.