

Impact of Notifications on Attention
esakal
प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com
मी त्याचं बोलणं प्रोसेस करत असतानाच, एक मन बँकेच्या ई - मेलचा विचार करत होतं, एकदा ती लिंक पाहू या का? तत्काळ दुसरं मन म्हणालं – मूर्खा फ्रॉड आहे तो! उघड कळतंय. मग तो विचार बाजूला सारला, आणि पुस्तकातल्या नायिकेचा विचार डोक्यात आला – तिला सेफ ठिकाणी पोचता येईल ना? आणि मग विचार आला, भावाने प्राइस हिस्टरी चेक केलं असेल ना खरेदीच्या आधी?
अधलंमधलं सदरातला लेख वाचून मैत्रिणीचा व्हॉट्सअॅपवर मेसेज आला : परवाचा तुझा लेख वाचला. आवडला... मी पुस्तक वाचत होतो. नोटिफिकेशनमध्ये तिचा सगळा मेसेज दिसला नाही, पण थोड्या वेळाने मेसेज पाहू असं ठरवून मी पुस्तकात डोकं घातलं. एखादं पान वाचलं असेल-नसेल, तेवढ्यात मित्राचा कॉल आला. तो मी घेतला नाही. दोन मिनिटांनी त्याचाच फोन आला. घेतला नाही. माझं एक मन पुस्तकात होतं. पुस्तकातली गोष्ट फार करुण आणि भावनिक होती. रडू, चीड, संताप आणणारी होती. दुसरं मन विचार करत होतं. मित्र का करत असेल फोन? काही अर्जंट काम तर नसेल? आणि तिसरं मन मैत्रिणीचा अभिप्राय मेसेज वाचण्याकरता उत्सुक होतं.