स्थलांतराची चढती कमान

जगभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जगण्यावर झाला. भारतातही कोरोनाच्या काळात महानगरातील कामकाज ठप्प झाले.
Migration
Migrationsakal
Summary

जगभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जगण्यावर झाला. भारतातही कोरोनाच्या काळात महानगरातील कामकाज ठप्प झाले.

- डॉ. डी. पी. सिंह

जगभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जगण्यावर झाला. भारतातही कोरोनाच्या काळात महानगरातील कामकाज ठप्प झाले. मोठ्या प्रमाणात रोजगार गेले. अनेकांना आपापले गाव गाठावे लगले. याच कालावधीचा स्थलांतराचा नॅशनल सॅम्पल सर्व्हे घेण्यात आला, त्यातील आकडेवारीवरून स्थलांतराच्या चढत्या कमानीचे विश्‍लेषण...

भारताने कोविडशी यशस्वीपणे लढा दिला आणि प्रचंड मोठा लसीकरणाचा कार्यक्रम राबवून देशभरात पसरलेल्या महामारीला नियंत्रित करण्यात यश मिळवले. देशातील जवळपास ९० टक्के लोकसंख्येला लशीचे दोन डोस देण्यात आले. पण, प्रश्न हा आहे की मार्च आणि जून २०२०च्या कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लोकांची काय परिस्थिती होती.

जानेवारी ते डिसेंबर २०२० दरम्यान राबवण्यात आलेल्या नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या ७८ व्या राऊंडमधील ‘मल्टिपल इंडिकेटर सर्व्हे’च्या माहितीचा आधार या लेखासाठी घेण्यात आला आहे. या सर्व्हेक्षणाची मुदत ऑगस्ट २०२१ पर्यंत विस्तारण्यात आली होती. २०३०च्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांचे काही सूचकांक विकसित करण्यासाठी माहिती संकलित करणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य हेतू होता. स्थलांतराची माहिती गोळा करणे हासुद्धा याचा हेतू होता. मल्टिपल इंडिकेटर सर्वेक्षणामध्ये एकूण दोन लाख ७६ हजार ४०९ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात एक लाख ६४ हजार ५२९ कुटुंबे ग्रामीण; तर १ लाख ११ हजार ८८० कुटुंबे शहरी भागातील होती.

२००७-०८च्या तुलनेत या सर्वेक्षणात स्थलांतरामध्ये वाढ झालेली दिसून आली. २००७-०८ मध्ये २८.५ टक्के स्थलांतर झाले होते, ते वाढून २०२०-२१ मध्ये २९.१ टक्के एवढे झाले. ‘पीएलएफएस’ने २०२०-२१ ला केलेल्या सर्वेक्षणात २८.९ टक्के एवढे स्थलांतर नोंदवले गेले होते. ‘एनएसएस’ने केलेल्या सर्वेक्षणात स्थलांतरामध्ये सातत्याने वाढ झालेली दिसून येते. यात १९८३ ला २३.४, १९९३ ला २४.८; तर १९९९-२००० ला २६.६ टक्के एवढी स्थलांतराची चढती कमान नोंदवण्यात आली. ग्रामीण भागात जवळपास २६.८ टक्के; तर नागरी भागात ३४.६ टक्के लोक स्थलांतरित होते.

ग्रामीण भागातून होणारे अर्ध्यापेक्षा जास्त स्थलांतर हे रोजगाराच्या शोधात, व्यवसायासाठी होते. बहुसंख्य महिलांचे ग्रामीण (९३.४ टक्के) आणि शहरी भागातील (७१.५ टक्के) स्थलांतराचे कारण हे विवाह आहे. ग्रामीण भागात ४२.४ टक्के आणि शहरी भागातील ७१.५ टक्के पुरुषांचे स्थलांतर हे उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरल्याचे निदर्शनास आले. आश्चर्य म्हणजे ४०.५ टक्के ग्रामीण भागातील आणि १०.६ टक्के शहरी भागातील स्थलांतरित पुरुषांनी आधीच्या ठिकाणापेक्षा उत्पन्नात घट झाल्याचे सांगितले. कोविडच्या काळात अनेक लोकांनी ग्रामीण भागात स्थलांतर केल्यामुळे असे झालेले असू शकते. आधीच्या ठिकाणाहून हस्तांतरित केलेल्या कागदपत्रांची माहिती यावेळी संकलित केली गेली. तेव्हा ग्रामीण भागात २७.९ टक्के आणि शहरी भागात १८.१ टक्के रेशन कार्ड हस्तांतरित झाल्याचे नोंदवण्यात आले. तसेच, मतदान ओळखपत्र ७.७ टक्के, पासपोर्ट ०.१ टक्के, आधार कार्ड ३.९ टक्के आणि इतर कागदपत्रे १.८ टक्के स्थलांतरितांकडून नोंदवण्यात आली. रेशन कार्ड हे भारतातील गरीब कुटुंबांसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अनुदानित पदार्थ मिळण्यासाठीचे महत्त्वाचे कागदपत्र आहे.

मल्टिपल इंडिकेटर सर्वेक्षणातून लोक सध्या राहत असलेल्या जागेवरून स्थलांतरित होऊ इच्छितात की नाही याची माहितीही संकलित करण्यात आली. तेव्हा ग्रामीण भागातील ११.१ टक्के; तर शहरी भागातील ६.५ टक्के पुरुषांनी बाहेर पडण्याची इच्छा बोलून दाखवली; परंतु महिलांमध्ये हे प्रमाण फक्त १.३ टक्केच होते. ग्रामीण भागातील ६०; तर शहरी भागातील ५२.८ टक्के पुरुषांना आधीच्या ठिकाणी स्थलांतरित व्हायचे होते; तर बहुधा त्यांच्या कोविडच्या अनुभवामुळे ग्रामीण भागातील जवळपास ४० टक्के आणि शहरी भागातील ४७.२ टक्के पुरुषांना आधीपेक्षा वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याची इच्छा होती.

(लेखक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com