मानससूत्र : ‘रचना’त्मक विचार

डिझाईन थिंकिंग किंवा ‘रचना’त्मक विचार म्हणजे कला; तसेच वैचारिक प्रक्रियेतून परीक्षण, विश्लेषण, योजनाबद्ध आराखडा समृद्ध जीवनासाठी बनविणे.
Thinking
ThinkingSakal

- डॉ. जयश्री फडणवीस

डिझाईन थिंकिंग किंवा ‘रचना’त्मक विचार म्हणजे कला; तसेच वैचारिक प्रक्रियेतून परीक्षण, विश्लेषण, योजनाबद्ध आराखडा समृद्ध जीवनासाठी बनविणे. आदिमानवा ते आजपर्यत मानवी जीवनाचा प्रवास हा नेहमीच समस्यांकडून समाधानाकडे जाताना दिसतो. आपले मन प्रत्येक क्षणातून, परिस्थितीतून आनंद शोधत असते. एखादी नकारात्मक घटना जरी घडली, तरी आपण पटकन् म्हणून जातो, ‘‘अरे! यातूनही काहीतरी चांगलेच घडणार!’’ या आणि अशाच विधायक आशांवर आपण जीवन जगत असतो.

अशाच या विचारांतून; तसेच परिस्थितीमधून कलेचे दालन उघडत गेले, सर्जनशीलतेत वाढ होऊ लागली. ललितकला व उपयोजित कलांद्वारे व्यक्तिमत्त्वविकासही होऊ लागला. कलेच्या माध्यमातून मानव वास्तवाच्या पलीकडे गेला आहे. वैचारिक पद्धत, सर्जनशीलता, विज्ञान व टेक्नॉलॉजी यांच्या मिलाफातून ‘डिझाइन थिंकिंग’ विकसित झाले. प्रत्येक क्षेत्राला एक वेगळाच, मानवी जीवनाला उपयुक्त आयाम प्राप्त झाला. जगणे सुखकर व सुंदर होऊ लागले. ‘डिझाईन थिंकिंग’ वैचारिक, वैज्ञानिक व तात्त्विक प्रक्रियेतून विकसित होत जाते. मानवी मनाचा सखोल अभ्यास केला जातो. मानवी समस्या व गरजांना प्राधान्य दिले जाते.

सहिष्णुता (Emphatthize) : कोणासाठी डिझाइन बनवत आहोत? ग्राहकाला नक्की काय हवेय? समस्या काय आहेत अथवा असू शकतात? त्याला नक्की काय महत्त्वाचे वाटते, याची जाणीव करून घेणे, समजून घेणे.

विश्लेषण (Define) : समस्या; तसेच आव्हाने काय आहेत याचे सर्व बाजूंनी परीक्षण करत जाणून घेणे. जसे की भोवतालची परिस्थिती, शैक्षणिक स्तर, आर्थिक व सामाजिक स्तर, या सर्व परिस्थितींचा अंदाज घेण्यासाठी अनेकांना भेटणे, मुलाखती घेणे; तसेच सखोल अभ्यास गरजेचा ठरतो.

कल्पनाविस्तार (Ideate) : एकदा का समस्येची जाणीव झाली, की त्या समस्येच्या गरजेनुसार विविध उपाय व कल्पना सुचणे.

मूळ नमुना (prototype) : एकदा का कल्पना सुचली, की असलेल्या समस्यांचे निराकरण विविध कल्पनांद्वारे करणे, त्याच्या विविध प्रतिकृती (Models) बनवणे.

चाचणी (Testing) : बनवलेल्या प्रत्येक प्रतिकृतीची चाचणी घेऊन त्यातील सर्वोत्तम प्रतिकृती निवडून, अपेक्षित उत्पादनाकरिता ते प्रत्यक्षात उतरवणे.

‘डिझाइन थिंकिंग’चा उपयोग एखाद्या उत्पादनातून मिळणारी सेवा अधिक चांगली करण्यासाठी होतो. याचा अनेक क्षेत्रांमध्ये वापर करावा लागतो, केला जातो. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट : कोणत्याही प्रकारच्या सॉफ्टवेअरचा ग्राहकाला सहज उपयोग करता आला पाहिजे, यावर लक्ष दिले जाते. उदा. मोबाइलमध्ये असणारे विविध अॅप्स.

वैद्यकीय क्षेत्र : काही महिन्यापूर्वी दुचाकीवरून पडून माझ्या पाठीला दुखापत झाली. संपूर्ण पाठीच्या कण्याचा CT Scan करावा लागला. MRI मशीनचा अनुभव घ्यावा लागला. पहिल्यांदा ते बोगद्यासारखे मशीन बघूत भीती वाटली; पण आत झोपल्यावर सुखद धक्का बसला. तेथील ऑपरेटरने माझ्या आवडत्या गाण्यांचे व्हिडिओ लावले.

थोडा वेळ दुखण्याचा विसर पडला. नंतर चौकशी केली असता कळले, की या ‘डिझाइन थिंकर्स’नी लहान मुलांचे MRI करताना मजेदार; तसेच अद्भुत दुनिया साकारली आहे. कधी जंगल सफारी, तर कधी समुद्रतळ, तर कधी चक्क स्पेसशिपमधून जाण्याचा अनुभव.

व्यावसायिक धोरण

एखाद्या कंपनीच्या उत्पादनाची मागणी कमी का झाली? ग्राहक नेमका कशामुळे असंतुष्ट आहे? याची समूळ कारणे शोधणे. यासाठी अनेक ग्राहकांशी चर्चा करणे; तसेच विविध सर्वेक्षणांचे आयोजन करणे. यातून ग्राहकास समाधान मिळवून देणे.

शिक्षण क्षेत्र

शिक्षण; तसेच प्रशिक्षणाच्या सहजच अवगत होतील अशा पद्धती शोधून काढणे. नुकत्याच झालेल्या कोविडच्या लॉक डाऊनमध्ये ‘डिझाइन थिंकिंग’च्या प्रक्रियेतून शिक्षण नियमितपणे सुरू राहण्यासाठी अनेक ऑनलाइन माध्यमांचा वापर केला. मग ते झूम, टीम अथवा गुगल मीट असो, प्रत्येक प्लॅटफॉर्ममध्ये काहीतरी वेगळेपणा होता.

शिक्षणोपयोगी साधनांचा कधी कलात्मक, तर कधी ग्राफिक्स अथवा कार्टून्स अशा पद्धतीने वापर केलेला आहे. ज्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यास प्रोत्साहनही मिळाले. वरील सर्व उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल, की मानवी जीवन सुंदर व समृद्ध बनवण्यात ‘डिझाइन थिंकिंग’चा खूप मोठा सहभाग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com